Friday, 11 July 2014

Mauli Mauli Song Lyrics and Details

गीतकार : गुरु ठाकुर
गायक : अजय गोगावले
संगीत : अजय - अतुल
चित्रपट : लै भारी
दिग्दर्शक : निशिकांत कामत

 || माउली माउली ||
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भीमेची निघाली
तुझ्या नामघोषत इंद्रायणी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
         हो ………
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नदावली
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जारी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माउली
माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातूनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा
दाटला मेघ तू सावळा
मस्तकी चंदनाचा टिळा
लेउनी तुळशी माला गळा ह्या
पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान
जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनात
भाबड्या लेकरांचा लळा
        हो.................
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नदावली
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जारी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माउली
माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.................
चलला गजर जहलो अधिर
लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन
आता पाहिन पांडुरंगाला
देखीला कळस डोईला तुळस
धावितो चंद्रभागेशी
समीपही दिसे पंढरी
याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली
तुझ्या पायरी ठेवतो माथा
माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली
पुंडलिका वरदे हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय